1 minute reading time (93 words)

[Times of Maharashtra]'मिसिंग लिंक'वर दरड कोसळली! सुप्रिया सुळे यांचा सरकारवर गंभीर सवाल

'मिसिंग लिंक'वर दरड कोसळली! सुप्रिया सुळे यांचा सरकारवर गंभीर सवाल

अतिवृष्टीमुळे 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित करत तातडीच्या चौकशीची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी 'मिसिंग लिंक'वरील दृश्ये अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. "महाराष्ट्राला पाऊस नवा नाही, पण एवढ्या प्रमाणात नुकसान प्रथमच पाहायला मिळत आहे," असे त्या म्हणाल्या. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री यांनी तातडीने संपूर्ण घटनेचा आढावा घ्यावा, सत्य जनतेसमोर आणावे आणि राज्यातील सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून नुकसानाचे पंचनामे आणि परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. 

[Lokshahi]'मिसिंग लिंकपासून मुंबई-पुणे मार्गांपर्य...
[Aapla Mahanagar ]12 वर्षांचा हिशेब केव्हा देणार? ...