2 minutes reading time (321 words)

[My Mahanagar]‘खरातनं देशात महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवलीय, संसदेत खासदार बोलतात की…’ सुप्रिया सुळेंचा संताप

‘खरातनं देशात महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवलीय, संसदेत खासदार बोलतात की…’ सुप्रिया सुळेंचा संताप

पुणे : भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. देशात खरातने महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवली आहे. संसदेत खासदार विचारतात, हे काय चालू आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 'समता भूमी' येथे सुप्रिया सुळे अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अशोक खरातचे विषय फार गांभीर्याने आपण घेतले पाहिजे. खरात प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हा खूप मोठा धक्का आहे. देशात खरातने महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवली आहे. बाकीच्या राज्यातील खासदार भेटतात, तेव्हा बोलतात, हे तुमच्या महाराष्ट्रात काय चालू आहे. हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे."

"सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आम्हाला कुठलेही आमंत्रण आले नाही. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमच्या शुभेच्छा होत्या. आजही खरे वाटत नाही, अजित पवार आपल्यात नाहीत. अजूनही आम्ही दु:खातून सावरलेलो नाही," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

"राहुरीचा निर्णय आम्ही स्थानिक नेत्यांवर सोडला होता. मित्र पक्ष आणि स्थानिक नेत्यांची भावना होती की, आपण निवडणूक लढली पाहिजे. प्राजक्त तनपुरे कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढले नाहीत," असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.

"अजित पवारांच्या अपघातासंदर्भात न्याय मिळवण्यासाठी रोहित पवारांना देशात आणि राज्यात फिरावं लागतं, हे वाईट आहे. ज्या महाराष्ट्राने अजित पवारांना न्याय द्यायला हवा होता, त्यांना तो दिला नाही. कर्नाटक सरकारने अजित पवारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यांची चौकशी केली पाहिजे. अजित पवारांच्या अपघाताला अडीच महिने झाले, पण सीआयडी काय करते? असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्लॅक बॉक्सचं काय झालं? ब्लॅक बॉक्स जळाला, अशी अफवा पसरवण्यात आली. अजित पवारांचा फोन सापडते. मग ब्लॅक बॉक्स का नाही?" असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. 

...

Supriya Sule : ‘खरातनं देशात महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवलीय, संसदेत खासदार बोलतात की…’ सुप्रिया सुळेंचा संताप

पुणे : भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. देशात खरातने महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवली आहे. संसदेत खासदार विचारतात, हे काय चालू आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी …
[ETV Bharat]बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणा...
[Maharashtra Times]'रिश्ते मायने रखते हैं', सुप्रि...