1 minute reading time
(73 words)
[Jai Maharashtra News]संत तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनासाठी खा.सुप्रिया सुळे दाखल
| महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यातच यंदाच्या वारीमध्ये राजकारणी देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील वारीमध्ये दाखल होणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आलं होत. आज पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं मनोमिलन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. | |

