1 minute reading time
(59 words)
[TV9 Marathi]उंड्री परिसरात सिमेंट व धुळीच्या प्रदूषणासंदर्भात नागरिकांशी संवाद
बारामती लोकसभा मतदारसंघातील उंड्री ता. हवेली येथील ध्रुव स्कुल, एसएनबीपी स्कुल, टाटा इनोरा पार्क, मयूरी इन्फिनिटी सोसायटीला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी सिमेंट आणि धुळीच्या प्रदूषणामुळे परिसरात निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी करून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. टँकरमुळे वाढते अपघात, खराब रस्ते, वाहतूक कोंडी या समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले.

