1 minute reading time
(73 words)
[Jai Maharashtra News]'पुण्यात सुधारणा नाही झाली, तर सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरेल'
पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कारभार पाहतात त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्याची गरज आहे," अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस आयुक्तांवर रोष व्यक्त केला.

