2 minutes reading time (308 words)

[ETV Bharat]'विषारी दारु मृत्यू प्रकरण गृहखात्याचं अपयश, पुण्याच्या कारभाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा'; सुप्रिया सुळे यांची मागणी

पुण्याच्या कारभाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा'; सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे - पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कारभार पाहतात त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्याची गरज आहे," अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस आयुक्तांवर रोष व्यक्त केला.

गृहखात्याचं अपयश - "पुणे हे शिक्षणाचं माहेरघर होतं. पण, आत्ता पुणे हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालं आहे. माझे हे आरोप नसून, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या डिपार्टमेंटचा एक रिपोर्ट आला आहे, ज्यात राज्यात पुणे गुन्हेगारीमध्ये एक नंबरवर तर देशात पाचव्या क्रमांकावर आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, पुण्यात गृहखातं हे अपयशी असून, लगेच ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कारभार पाहतात त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्याची गरज आहे," असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवलं. 

सक्तीच्या सुट्टीवर पाठवा - त्या पुढे म्हणाल्या की, पुण्यात एवढी गुन्हेगारी का वाढली आहे? याबाबत पुण्याच्या कारभाऱयांची चौकशी व्हायला पाहिजे. त्यानंतर त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं पाहिजे. आज शहरात जी स्थिती पाहायला मिळते त्याला पूर्णपणे पुण्याचे कारभारी जबाबदार आहेत. पुण्यात सुधारणा नाही झाली तर सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

विषारी दारु प्रकरण थांबवता आलं असतं - "विषारी दारू प्रकरण हे सरकारचं अपयश आहे. सरकारला हप्ते हा शब्द माहिती नाही का? सरकारला हे सगळं माहिती होतं. जी हत्या झालीय याला जबाबदार कोण? याला सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्र सरकारला याबाबत आधीच माहिती होती. आधीच हे थांबवता आलं असतं," असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.

...

'विषारी दारु मृत्यू प्रकरण गृहखात्याचं अपयश, पुण्याच्या कारभाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा'; सुप्रिया सुळे यांची मागणी

पुण्यातील विषारी दारु मृत्यू प्रकरणावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि पुणे पोलीस आयुक्तांवर रोष व्यक्त केला.
[ABP MAJHA]राष्ट्रवादीत निष्ठावंतांना डावलून मर्जी...
[Nvarashtra]२२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आ...