1 minute reading time (231 words)

[Sakal]दुष्काळी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

दुष्काळी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

पुणे : ''राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती असून, बळीराजा संकटात सापडला आहे. सरकारने दुष्काळी मदतीचे केवळ आश्वासन दिले; मात्र ही मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका आहे. परंतु प्रचंड दुष्काळ आणि वाढत्या बेरोजगारीमुळे जनता त्रस्त असून, आम्ही ठोस परिणामांची वाट पाहत आहोत,'' असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

खासदार सुळे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयास गुरुवारी (ता. १) भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, राज्य घटनेने मतदारांना दिलेला मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे धोक्यात आला आहे. लोकशाही आणि संविधानाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही सर्व विरोधक ताकदीनिशी एकजुटीने लढा देऊ.

मुंढवा येथील ४० एकर शासकीय जमीन प्रकरणी पोलिस महासंचालकांनी पुणे पोलिसांना सविस्तर तपासाचे आदेश दिले आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, ''या प्रकरणाची मला पूर्ण माहिती नाही. यावर राज्याचे गृहमंत्रीच उत्तर देऊ शकतील.''

दौंड तालुक्यातील स्त्री भ्रूणहत्येच्या घटनांबाबत सुळे म्हणाल्या, ''दौंड हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, एका बेजबाबदार डॉक्टरच्या कृत्यामुळे जिल्ह्याचे नाव मलिन झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे ही दुर्दैवी बाब आहे.'' 

...

दुष्काळी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका. Drought Relief: Farmers still await promised aid, says Supriya Sule

दुष्काळी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका; सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह. Farmers drought relief: Supriya Sule criticizes government for failing to deliver promised aid. Severe drought and unemployment leave citizens distressed.
[Lokmat]"बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया ...