1 minute reading time
(257 words)
[RNO Official]हर्षवर्धन पाटीलांना उमेदवारी देताना ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली -सुप्रिया सुळे
- महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत. हे गृहमंत्र्यांचा अपयश आहे आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा याच पोलिसांचा दोष नाही तर नेतृत्व अपयशी ठरला आहे. त्यामुळे वेळीच गुन्हे दाखल होत नाहीत म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
- पाटील कुटुंब हर्षवर्धन पाटील यांचे आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत. याचा आनंद आहे मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते
- हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी मात्र हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे आणि जे नाराज आहेत त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करू
- शरद पवार बोलले ते खर आहे, सगळ्यात जास्त प्रश्न आम्हीच विचारले आहेत संसदेत सगळ्यात जास्त प्रश्न आरक्षणासंदर्भात आम्हीच विचारले आहेत. मराठा आरक्षण विषय हा केंद्राशी निगडित आहे त्यामुळे कुठलेही सरकार असलं त्यांनी मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहो
- ए आय एम आय एम कडून महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव आला असेल तर मला त्याची माहिती नाही आमच्या वरिष्ठांकडे तो प्रस्ताव आला की नाही याबाबत पक्षाचे वरिष्ठच सांगू शकतील.
- अजित पवारांच्या पक्षाने बारामतीतून कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर बोलणार नाही मात्र आमच्या पक्षांमध्ये सक्षम उमेदवार आहे आणि फक्त बारामतीतच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत आपल्या भारतात टॅलेंटला कमी नाही संपूर्ण भारतात टॅलेंट आहे, कुणीही अति आत्मविश्वासात राहू नये.

