1 minute reading time (102 words)

[ABP MAJHA]राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध आम्ही जपतो-सुप्रिया सुळे

राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध आम्ही जपतो-सुप्रिया सुळे


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्या प्रकृतीबाबतही सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे.हा फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. एन. डी पाटील यांच्या पत्नी सरोजनी पाटील या शरद पवार यांच्या बहीण आहेत. एन. डी पाटील आणि शरद पवार यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला आहे. पण, व्यक्तिगत नात्यात कधीही दुरावा आला नाही. आमची व्यक्तिगत लढाई कुणाशीही नाही," असं सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या भेटीवर स्पष्ट केलं.

[lokmat]"पवार कुटुंबांच्या भेटीत काय घडलं?
[Zee 24 Taas]पवार कुटूंबाच्या एकत्र भेटीनंतर सुप्र...