1 minute reading time
(93 words)
[Mumbaii Outlook]अजित पवारांचा फोन सापडला, मग ब्लॅक बॉक्सचा डेटा कुठे आहे? Supriya ताईंचा सवाल
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर इतर पक्षातील नेत्यांनी जाहीर व्यक्त केला. आमदार रोहित पवार यांनी तर चार पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले आणि हा घातपात असल्याचा दावा केला. त्यांच्या प्रयत्नानंतर कर्नाटकात या विमान अपघाताप्रकरणी झिरो एफआयआर दाखल झाला. पण महाराष्ट्रात अद्याप दादांच्या विमान अपघाताप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान याप्रकरणी आता खासदा सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

