1 minute reading time
(67 words)
[Zee 24 Taas]शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार? सुप्रिया सुळे
आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून संसदेत मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला (Delimitation bill) शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पाठिंबा देणार असल्याच्या सर्व चर्चा निराधार आहेत. आमच्याकडे या विधेयकासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर अभ्यास करुन 24 तासांमध्ये भूमिका मांडू, अशी स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली. त्या बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

