1 minute reading time (95 words)

[Lokshahi Marathi]भाजपकडून इतके पैसे आले कुठून ? सुप्रिया सुळे आक्रमक

भाजपकडून इतके पैसे आले कुठून ? सुप्रिया सुळे आक्रमक

नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाले एवढे पैसे भाजपकडे कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही निवडणूक लढता येते पण महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्नी, आई विरोधात निवडणूक लढता येत नाही अशी अवस्था आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत पैशांच्या थैल्या उघड झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात नोटांचे बंडल असलेल्या थैल्या सापडल्या, भाजपकडे एवढे पैसे आले कुठून असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निवडणूक सुधारणांवर आयोजित चर्चा करत असताना केला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची चर्चा यानिमित्ताने देशाच्या सर्वोच्च सभागृहात झाली. 

[Loksatta]सुप्रिया सुळेंनी संसदेत केलं निलेश राणें...
[News18 Lokmat]भाजपकडे पैसे कसे काय मिळतात? लोकसभे...