1 minute reading time
(75 words)
[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

