1 minute reading time
(54 words)
[Lokmat]सुप्रिया सुळेंची इंडिया आघाडी मोर्चाआधीची प्रेस, काय सुनावलं?
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

