2 minutes reading time (307 words)

[latestly]अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

 Supriya Sule Became Best MP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदरासंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदार (Best Member of Parliament) ठरल्या आहेत. संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात खासदार सुप्रिया सुळे अव्वल ठरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी 229 चर्चासत्रांमध्ये तब्बल 546 वर विचारले प्रश्न विचारले.

संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके यावरून देशातील सर्वोत्कृष्ठ खासदाराची निवड केली जाते. या सर्व निकषांमध्ये सुप्रिया सुळे अव्वल ठरल्या असून त्या देशातील सर्वोकृष्ठ खासदार ठरल्या आहेत. 2019 पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, तसेच त्यांनी किती प्रश्न विचारले आणि विशेष म्हणजे त्यांची सभागृहातील उपस्थिती किती होती? या सर्वांची गोळाबेरीज करून सर्वोत्कृष्ठ खासदार निवडीची प्रक्रिया पार पाडली जाते. यात सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक 711 गुण मिळवले आणि त्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या.

याशिवाय देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ठ खासदार म्हणून झारखंडमधील भाजपचे विद्यूत बारन महतो यांची निवड झाली आहे. त्यांनी यात 616 मानांकन मिळवले आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालचे भाजपा खासदार सुकांता मुझूमदार यांनी स्थान मिळवलं आहे. दरम्यान, सध्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 17 व्या लोकसभेतील खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी 15 व्या आणि 16 व्या लोकसभेत खासदार म्हणून काम केले आहे. सुप्रिया सुळे यांनी 2011 मध्ये स्त्री भ्रूणहत्येविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केली. त्यांच्या या मोहिमेला मोठं यश मिळालं.

...

Supriya Sule Became Best MP: अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार | 📰 LatestLY मराठी

2019 पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, तसेच त्यांनी किती प्रश्न विचारले आणि विशेष म्हणजे त्यांची सभागृहातील उपस्थिती किती होती? या सर्वांची गोळाबेरीज करून सर्वोत्कृष्ठ खासदार निवडीची प्रक्रिया पार पाडली जाते. 📰 Supriya Sule Became Best MP: अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार.
[mahaenews]सुप्रिया सुळे पुन्हा एकदा ठरल्या नंबर व...
[letsupp]पुन्हा एकदा सुप्रिया सुळेबनल्या देशातील स...