1 minute reading time (66 words)

[ABP MAJHA]दी. बा. पाटील विमानतळ नावासाठी दिल्लीत सर्वपक्षीय खासदार एकवटले

दी. बा. पाटील विमानतळ नावासाठी दिल्लीत सर्वपक्षीय खासदार एकवटले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत डी. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, रविंद्र वायकर, श्रीरंग बारणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. आंदोलनानंतर श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले.  

[Soha Ali Khan]Supriya Sule on Family, Power & Pol...
[Loksatta]मारहाणीची 'एसआयटी' चौकशी हवी; विरोधकांची...