1 minute reading time
(64 words)
[Civic Mirror]नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येत असेल तर ते अयोग्य
"लोकशाहीत नागरिकांचा मतदानाचा हक्क हा सर्वात पवित्र अधिकार आहे. जर या मूलभूत मतदानाच्या अधिकारावरच गदा येणार असेल, तर ते अजिबात योग्य नाही. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे," अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडली आहे.

