1 minute reading time
(80 words)
[Saam TV]'सत्तेमधे असलेल्या लोकांना वेगळा न्याय... विरोधीपक्षावर वेगळा', Supriya Sule स्पष्टच म्हणाल्या
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'Black & White with Nilesh Khare' या कार्यक्रमात देशातील न्यायव्यवस्थेवर आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. संसदेत मांडण्यात आलेल्या 'न्युक्लिअर बिल' (SHANTI Bill) वर त्यांनी सरकारला धारेवर धरले. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असतानाच, त्याच अमित शाहांनी धनंजय मुंडे यांना भेट दिल्याबद्दल सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'सत्तेतल्या लोकांना वेगळा न्याय आणि विरोधकांना वेगळा', असे म्हणत त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला.

