[News18 Marathi]अमित शाह भ्रष्टाचारावर बोलत होते अन् त्यांच्या पाठीमागं
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांवर टिका केल्याशिवाय हेडींग होत नाही. आम्ही लोकशाहीतून आलो आहेत, दडपशाहीतून नाही. अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. मोदी सरकारनं पद्मविभूषण देऊन पवार साहेबांचा सन्मान केला आहे. कदाचित अमित शाहांना विसर पडला असेल. भाजपनं हे सांगावं भ्रष्टाचार की पद्मविभूषण. अमित शाह जिथून बोलत होते, ते बालेवाडी क्रीडा संकूल देखील आमच्याच काळात बनले आहे. त्याचा विसर त्यांना पडला असेल, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
दरम्यान त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, 'अमित शाह भ्रष्टाचाराचे आरोप करत होते पण मागे अशोक चव्हाण बसले होते. डर्टी डझन मध्ये कोण कोण आहेत हे माहीत आहे. आमचं चिन्ह आणि पक्ष फोडलेले डर्टी डझन मंत्रिमंडळात आहेत. मोदीजी बारामतीला येऊन गेले. त्यांना मान सन्मान दिला' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

