1 minute reading time
(51 words)
[Lokshahi Marathi]Supriya Sule यांच्या पाठपुराव्याला यश; बनेश्वर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास PMRDAकडून मंजुरी
नसरापूर गाव ते बनेश्वर मंदिर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरावा आणि आंदोलनाला यश मिळाले आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) कडून २ कोटी ९४ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात कामास सुरुवात होणार आहे.