1 minute reading time
(255 words)
[Dainik Prabhat]सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्याला अखेर यश; बनेश्वर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास PMRDA कडून २.९४ कोटींची मंजुरी
नसरापूर गाव ते बनेश्वर मंदिर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरावा आणि आंदोलनाला यश मिळाले आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) कडून २ कोटी ९४ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात कामास सुरुवात होणार आहे.
स्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थ, बनेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून या कामाच्या मंजुरीसाठी ठाम भूमिका घेतली होती. त्यानंतर पीएमआरडीएने पुढाकार घेत प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक तयार केले.
रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि संरक्षक भिंतींचे बांधकाम | |
७५० मीटर लांबी व ५.५ मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रिट रस्ताl | |
३ ठिकाणी ३ फूट व्यासाच्या पाईप मोऱ्या | |
१० ठिकाणी २ फूट व्यासाचे आडवे पाईप | |
२५० मीटर लांबीची नदीकडील संरक्षक भिंत | |
उजव्या बाजूसही माती अडवण्यासाठी संरक्षक भिंत | |
दहा महिन्यांत काम पूर्ण होण्याचा अंदाज |
३० मे रोजी पीएमआरडीएचे उपायुक्त संभाजी पाटील व सहाय्यक अभियंता जयेश बदाने यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना कामाच्या तपशीलांची माहिती दिली. या वेळी सरपंच उषा कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण, सदस्य गणेश दळवी, सुधीर वाल्हेकर, इरफान मुलाणी, ट्रस्टचे उपाध्यक्ष हनुमंत कदम, सचिव अनिल गयावळ, काशिनाथ पालकर, माजी सभापती लहुनाना शेलार, यशवंत कदम, ज्ञानेश्वर झोरे, विक्रम कदम, ठेकेदार सुरज मरळ आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्याला अखेर यश; बनेश्वर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास PMRDA कडून २.९४ कोटींची मंजुरी!
नसरापूर : नसरापूर गाव ते बनेश्वर मंदिर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरावा आणि आंदोलनाला यश मिळाले आहे.