[ABP MAJHA]Yugendra Pawar यांना कुस्तीगीर परिषदेने हटवलं? सुप्रिया सुळे म्हणतात...
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पवार कुटुंबातील संघर्ष उफाळून आला होता. या संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता असून तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे. अशातच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यापूर्वी अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हा कुस्तीगीर संघ काम करत होता. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच युगेंद्र पवार यांना या बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

