1 minute reading time
(65 words)
[ABP MAJHA]Vidhan Sabha Elections 2024
लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली..बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या.