[Lokshahi Marathi]मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Supriya Sule : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज 23 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडत आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. बारामती पोट निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. या बारामती पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बारामतीत राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. परिणामी, बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. बारामतीच्या या पोटनिवडणुकीत 23 उमेदवार रिंगणात आहेत.
मतदानाला सुरूवात झाली असून सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सु्प्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,"कुठलीही पोटनिवडणूक कुठल्याही कुटुंबासाठी आनंदाची नसते. दादा गेल्यानंतरची ही निवडणूक आहे. मला ही आज मतदान करताना विश्वास बसत नव्हता की, आपण दादाला मतदान करत नाही आहे. बाबांचा हट्ट होता, बाबांना मतदान करायचे होते पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळा पण जास्त आहे त्याच्यामुळे डॉक्टरांचे असे म्हणणं होते की, एवढी दगदग करू नये. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे." असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

