1 minute reading time
(99 words)
[Times Now Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद
राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांना काही गोष्टी सुचत आहेत, उशीरा का होईना गरीब कष्टक-यांसाठी ते जर काही करणार असतील तर त्याचे मी मनापासून स्वागतच करेन. सरकारने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, त्याचा लाभ समाजातील सर्वच पात्र व्यक्तींनी घ्यावा अशी माझी भूमिका आहे, असे सुळे म्हणाल्या आहेत.

