1 minute reading time (121 words)

[Puneri Awazz]एका व्यक्तीचे घर नसून, पवार कुटुंबियांचं घर आहे-सुप्रिया सुळे

एका व्यक्तीचे घर नसून, पवार कुटुंबियांचं घर आहे-सुप्रिया सुळे

काटेवाडीतलं घर हे कुठल्याही व्यक्तीचं घर नाही. ते शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. त्यामुळे त्या घरावर आमचा सगळ्यांचा हक्क आहे. माझ्या बाकीच्या भावंडांनाही वाईट वाटतं की हे आपलं घर आहे. माझ्या आशाकाकी तिथे राहतात. मी इथे आधी येत नव्हते. मात्र यावर्षी संसदेत काम सुरु होतं. ज्या दिवशी पालखी दिवेघाटात होती तेव्हा पंतप्रधानांचं भाषण होतं म्हणून त्या दिवशी येऊ शकले नाही. त्यामुळे मी बारामतीत जिथे पालखी आहे तिथे जाते आहे. आज काटेवाडीत आले आहे. काकी येतील असं वाटलं होतं पण काकी नाही आल्या. त्यामुळे आशाकाकींना भेटायला गेले होते. अजित पवार आणि सुनेत्रा पवार जेवणाच्या कार्यक्रमात व्यग्र होते. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. सगळे गडबडीत होते, त्यामुळे कुणाशी काही चर्चा करायचा काही विषयच आला नाही. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. 

[YML News]राज्य सरकार भ्रष्ट जुमलाबाजीचं सरकार - स...
[NDTV Marathi]भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार, सुप्रि...