1 minute reading time (80 words)

[CM News]'शेतकऱ्यांबाबत महाराष्ट्राचं सरकार असंवेदनशील'

 'शेतकऱ्यांबाबत महाराष्ट्राचं सरकार असंवेदनशील'

सुप्रिया सुळे यांचा आरोप

शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके देखील अहमदनगर येथे आंदोलनास बसले आहेत. तर लंके यांच्या नेतृत्वात "शेतकरी जन आक्रोश" आंदोलनाचा रविवार (ता.७) तिसरा दिवस आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाना साधत टीका केली आहे. राज्यासह केंद्रातील ट्रीपल इंजीन सरकार असंवेदनशील असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. सुळे बारामतीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यावेळी बोलत होत्या. 

[Kokan News]विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा...
[YML News]राज्य सरकार भ्रष्ट जुमलाबाजीचं सरकार - स...