1 minute reading time (110 words)

[TV9 Marathi]ईडी, सीबीआयच्या 95 टक्के कारवाया विरोधकांवर

ईडी, सीबीआयच्या 95 टक्के कारवाया विरोधकांवर

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. मात्र, आता ही शंका न राहता खरंच त्या दिशेने पाऊल जात असल्याचे दिसून येत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे घटक आहेत. देशमुख, खडसे, राऊत, नवाबाभाई असतील त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, त्याच पद्धतीने कारवाई होत आहे. देशातील ईडी सीबीआयच्या 95 टक्के कारवाई या विरोधकांवरील आहेत. संविधानाचा सन्मान न करता केंद्र सरकार काम करत आहे. '

[TV9 Marathi]भाजपची ‘ही’ कृती संविधान विरोधी, मी स...
[maharashtra desha]मुश्रीफांवर ईडीची कारवाई; सुप्र...